तुळजापूर दि. २ (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त देवींची पारंपारिक भव्य मिरवणूक मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने पार पडली. “आई राजा उदो-उदो”, “जय भवानी-जय शिवाजी” या घोषणांनी गावाचा मुख्य रस्ता दुमदुमून गेला होता.डॉल्बीवरील भक्तिमय गीते, हालग्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर आणि आराध्यांचा उत्साह अशा गडगडाटी वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. मातेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी व भव्य सोहळा पाहण्यासाठी विशेषतः महिलांची मोठी गर्दी उसळली होती.
शिमोलंघन परंपरेनुसार खंडोबा पालखीची घोड्यासह मिरवणूक निघाली. “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गर्जनेने संपूर्ण परिसर दैवी वातावरणाने भारावून गेला. विजयादशमीचा हा सोहळा सत्य-असत्याच्या लढाईत धर्म व न्यायाच्या विजयाची जाणीव करून देणारा ठरला.
अण्णा चौकापासून काळा मारुती मंदिरापर्यंत सर्व नवरात्र मंडळांच्या देवींच्या मूर्तींची पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. यात जय भवानी नवरात्र मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नवरात्र मंडळ, संत रोहिदास नवरात्र मंडळ, जय श्रीराम सांस्कृतिक मंडळ, सेवालाल नवरात्र तरुण मंडळ, देवराव नवरात्र मंडळ, कुंभार नवरात्र मंडळ यांचा सहभाग होता.मिरवणुकीत ग्रामस्थांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या भक्तिमय मिरवणुकीने गावातील वातावरण उत्साह, श्रद्धा आणि ऐक्याने भारावून गेले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवानंद मुडके, सचिन तोगी, सुभाष घोडके, बालाजी राजपूत, धनराज कुत्ताडे, महादेव तोग्गी, आप्पासाहेब शेटे, विश्वजीत पाटील, नितीन गळाकाटे, महादेव घोडके, अमोल वाघे, बंटी दुधाळकर, राम भालेकर, अंकुश कांबळे, किरण कांबळे, रवी टिळेकर, शिवाजी कांबळे, तुकाराम कांबळे, दत्ता कांबळे, सिकंदर अंगुळे, अजित कांबळे, गणपती कांबळे, किशोर बायस, बालाजी घुगे, विवेक हिप्परगे, अभिजीत बिराजदार, शिवराज रेणके, योगेश जाधव, किरण रेणके, गणेश राठोड, सतीश चव्हाण, शिवाजी जाधव, पिंटू चव्हाण, तिपन्ना कबाडे, संगप्पा कुताडे, आकाश कसबे, महादेव गिराम यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a reply













