राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील जातप येथील रहिवासी व शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव यांची शिवसेना अध्यात्मिक आघाडीच्या अहिल्यानगर शहर समनव्यकपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी शिवसेना पक्षाच्या व देशातील ज्वलंत अशा हिंदुत्वाचे, भक्तीशक्तीचे प्रतीक असलेल्या शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेची कार्यकारणी विस्तारीत करण्यात आली आहे.त्यानुसार अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव यांची अहिल्यानगर शहर समनव्यक पदी निवड करण्यात आली आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील प्रत्येक समस्येवर वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपत महाराज जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
Leave a reply













