राहुरी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर मार्गालगतच्या ब्राह्मणी शिवारात गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतदेह दिसताच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांमध्ये ही बातमी क्षणात पसरली व मृतदेह पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गर्दी पांगवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.
सदर मृतदेहाजवळ पोलिसांनी परिसराची तपासणी केली. यामध्ये पो.ह. संजय राठोड, सुरज गायकवाड, सुनील निकम, पो.का. ढाकणे, नजीम शेख, अंकुश भोसले व ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सहभाग घेतला. मात्र मृतदेहाजवळ संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
या घटनेत मृत्यू नेमका अपघातामुळे झाला की आत्महत्या आहे, अथवा घातपाताचा भाग आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मृतदेहाची अवस्था पाहता ही घटना बुधवारी उशीरा रात्री अथवा गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू होती. सदर प्रकरणी राहुरी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
राहुरीत ब्राह्मणी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात पोलिसांकडून तपास सुरु
0Share
Leave a reply












