मानोरी (सोमनाथ वाघ) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित ग्रामसभा मानोरी येथील मारुती मंदिराच्या सभा मंडपात उत्साहपूर्ण वातावरणात व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. ताराबाई भिमराज वाघ यांनी भूषवले, तर ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड यांनी सभेची प्रस्तावना व प्रोसिजर वाचन केले.
ग्रामसभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ या विशेष उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या उपक्रमांत गावातील प्रत्येक नागरिकाने सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ग्राम महसूल अधिकारी सौ. सोनाली जहाड यांनी गावातील ग्रामीण रस्ते, पानंद रस्ते, गाडी रस्ते व शिवर रस्त्यांच्या विकासाविषयी सविस्तर माहिती ग्रामस्थांसमोर मांडली. रस्त्यांच्या सुदृढीकरणाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व ग्रामपंचायतीच्या विकासाभिमुख प्रयत्नांचे कौतुक केले.
ग्रामसभेच्या अखेरीस काही ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा झाली. ग्रामस्थांनी संयमाने आपापल्या अडचणी व सूचना मांडल्या. त्यावर ग्रामपंचायतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सभेचा संपूर्ण कार्यक्रम लोकसहभाग, पारदर्शकता व विकासाभिमुख दृष्टिकोन यावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले.या ग्रामसभेस महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ग्रामसभेस उपस्थित मान्यवरांमध्ये निवृत्ती आढाव, उत्तमराव खुळे, उत्तमराव आढाव, बापूसाहेब वाघ, शरदराव पोटे, शामराव आढाव, शिवाजी थोरात, अण्णासाहेब ठुबे, नवनाथ थोरात, अमोल भिंगारे, नानासाहेब आढाव, दादासाहेब आढाव, रहेमान पठाण, गोकुळदास आढाव, चांदभाई पठाण, बाळासाहेब आढाव, संजय डोंगरे, भाऊसाहेब आढाव, राजेंद्र पिले, विलास थोरात, अक्षय पोटे, चांदभाई शेख, सदस्य दिलशाद पठाण, सुमन आढाव, कृषी सहाय्यक एस.व्ही. हरिचंद्र, अंगणवाडी सेविका मंदाकिनी हापसे, सुरेखा शिंदे, सविता आढाव, ज्योती आढाव, विजया बाचकर, सरिता आढाव, आशासेविका वैशाली थोरात, पोलीस पाटील भाऊराव आढाव, महसूल सेवक दिपक कोल्हे, ग्रामपंचायत क्लार्क सागर भिंगारे यांच्यासह इतर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानोरी ग्रामसभेत ग्रामविकासासाठी उत्स्फूर्त सहभाग; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाची माहिती, ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद

0Share
Leave a reply












