राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहुरी आठवडे बाजारातून मोटरसायकल चोरी झाल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणत आरोपीस जेरबंद केले. तसेच पोलीस कस्टडी दरम्यान चोरी गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादी शैलेश पांडुरंग शेटे, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गु.र. नं. १०६९/२०२५, बि.एन.एस. ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी विशाल मच्छिंद्र थोरात (वय ३५, रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) यास त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली.
न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. रिमांड दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेली मोटरसायकल जप्त केली आहे. या आरोपीकडून आणखी काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदरची कारवाई मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर; मा. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, डॉ.जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे व पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे यांनी केली.
राहुरी आठवडे बाजारातील मोटरसायकल चोर २४ तासांत पोलिसांच्या जाळ्यात, चोरी गेलेली मोटरसायकल जप्त; आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता

0Share
Leave a reply












