हवेली तालुका प्रतिनिधी / किरण थोरात : हिंगणगावचे माजी सरपंच सागर थोरात यांच्या पुढाकारातून “ऑलस्टेट इंडीया ग्रीन कव्हर प्रोजेक्ट २०२५-२६” अंतर्गत हिंगणगाव ग्रामपंचायत गावठाण परिसरात हजारो झाडे लावून भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी ऑलस्टेट इंडीया प्रायव्हेट लिमिटेड व द फॉरवर्ड फाउंडेशन या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला कंपनीचे मॅनेजर श्री. मिलिंद पाटील, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक कुंडलीक थोरात, हिंगणगावचे माजी सरपंच कुंडलीक पा. थोरात, ग्रामसेविका सुवर्णा लोंढे, मिरवडीचे सरपंच सागर शेलार, दौंड मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब शिंदे, हिंगणगावचे पोलिस पाटील काळुराम थोरात, माजी सरपंच विजय गायकवाड, विद्यमान सरपंच सौ. शशिकला पोपळघट आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच अंकुश कोतवाल, ज्ञानेश्वर थोरात, राहुल थोरात, अतुल गायकवाड, सुखदेव कांबळे, सुभाष गायकवाड, लंका वेताळ, काळुराम थोरात यांच्यासह अनेक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या वृक्षारोपणामुळे गाव हरितमय होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हिंगणगाव ग्रामपंचायत गावठाणात हजारो झाडांचे वृक्षारोपण, माजी सरपंच सागर थोरात यांच्या प्रयत्नांना यश

0Share
Leave a reply












