राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिस स्टेशन येथे दिनाक २/०९/२०२५ रोजी अल्पवयीन मुलीस पळवून नेलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता . नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने राहुरी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन जाणाऱ्याआरोपीस मदत करणारे इसम जोडपे1) महेश प्रदीप निकम राहणार ममदापूर तालुका राहता, 2) अमृता महेश निकम यांना गुन्ह्यात आरोपी करून आरोपी महेश प्रदीप निकम राहणार ममदापूर तालुका राहता यास दिनांक 3/ 9 /2025 रोजी अटक करून आज रोजी मान्य न्यायालयापुढे पोलीस कस्टडी रिमांड साठी हजर ठेवले असता त्यास पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे .आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मिळणे कामे सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती सविता गांधले यांनी काम पाहिले .
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके,पोलिस नाईक प्रवीण बागुल,पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद यांनी मा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सो,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे सो,उप विभागीय पोलीस अधिकारी भवर सो यांचे मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सदर गुन्ह्याचा तपास चालू असून पोलिस दलातर्फे आव्हान करण्यात येत आहे कोणीही अशाप्रकारे अल्पवयीन मुलीस पळून जाण्यास मदत करू नये अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्यात येईल .
Leave a reply













