SR 24 NEWS

सामाजिक

जवाहर महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे उद्घाटन संपन्न

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी दि.15 (चंद्रकांत हगलगुंडे) : 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या हिंदी सप्ताहाचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया शाखा अणदूरचे सहाय्यक अधिकारी अरफा तब्सुम यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी ,उप प्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे ,हिंदी विभाग प्रमुख डॉ. मीना जाधव, डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतानाअरफा तब्सुम म्हणाल्या की, देशाला एकतेच्या सूत्रात बांधण्याची कला हिंदी भाषेत आहे. बँकेची सेवा करीत असताना मी संपूर्ण देशात फिरले. सर्व लोकांशी संपर्क करायचे असेल तर हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही. भाषा ही विचार विनिमयाची साधन आहे. मातृभाषा ,राष्ट्रभाषा ,आंतरराष्ट्रीय भाषा आत्मसात करून आपण देशाला पुढे नेऊ या अशी विद्यार्थ्यांना आवाहन केले. उप प्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे म्हणाले की, विविधता आपल्या देशाची संस्कृती आहे. भाषेमुळे समाज, संस्कृती जोडली जाते. हिंदी भाषा सगळ्यांना जोडण्याचं काम करीत आहे.

महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दुसऱ्या राष्ट्राशी संपर्क करायचा असेल तर आपल्याला हिंदी भाषेची आवश्यकता आहे. आपण आत्मसात करू या. डॉ.प्रसन्न कंदले यांनी हिंदी गीत गायन केले. प्रस्ताविक डॉ. मीना जाधव यांनी ,सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार व आभार डॉ. सत्तेंद्र राऊत यांनी मानले . हिंदी सप्ताहामध्ये वक्तृत्व, निबंध ,देशभक्तीपर गीत, काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुभांगी स्वामी, संतोष चौधरी ,दिलीप चव्हाण ,गणेश सर्जे , नामदेव काळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!