SR 24 NEWS

क्राईम

अपहरित 02 पीडित मुलींची 24 तासात सुटका , राहुरी पोलिसांकडून आरोपी जेरबंद, मागील दीड वर्षात एकूण अल्पवयीन 82 मुलींची सुटका

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) ११ सप्टेंबर – : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी गुरनं. 1036/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिसांनी मुलींचा शोध सुरू केला. गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पीडित मुली व त्यांना पळवून नेणारा आरोपी हर्षल सतीश इरुळे (रा. गुहा, ता. राहुरी) हा पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोउपनि. नितीन सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुण्यात दाखल होत खडकी पोलीस स्टेशन, पुणे पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दिनांक 10 सप्टेंबर रोजी आरोपीसह अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले.

पीडित मुलींनी चौकशीत दिलेल्या जबाबानुसार आरोपीने त्यांचा अज्ञानपणा व असहाय्यता लक्षात घेऊन लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 87 प्रमाणे वाढ करण्यात आली. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्यास 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सविता गांधले यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास पोउपनि. विष्णू आहेर हे करत आहेत.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेण्याच्या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 82 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आवाहन केले की, “मुलींनी अनोळखी व्यक्तींच्या भुलथापाला बळी पडू नये. शालेय विद्यार्थिनींना कोणी त्रास देत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.”

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. विष्णू आहेर, नितीन सप्तर्षी, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, पोना. देविदास कोकाटे, पोकॉ. गणेश लिपणे, शेषराव कुटे, आजिनाथ चेमटे, मपोकॉ. वंदना पवार तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पोहेकॉ. संतोष दरेकर व सचिन धनाड यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!