SR 24 NEWS

क्राईम

अँट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मिळणार नाही असे स्टेटस ठेवल्याने खडांबे येथील तरुणाला बेदम मारहाण

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (आर. आर. जाधव) : सर्वोच्च न्यायालयाने ॲट्रॉसिटी गुन्ह्यात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळणार नाही, असा आदेश चार दिवसांपूर्वी दिला होता. या संदर्भातील बातमी सोशल मिडियावर स्टेटसला ठेवल्याचा राग मनात धरून राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथे एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

सुजित संजय पवार (वय २५, रा. खडांबे बुद्रुक) हा लॅब टेक्निशियन व्यवसाय करणारा तरुण त्या दिवशी संध्याकाळी ९ वाजता गावातील शाहू विद्या मंदिर हायस्कूलजवळ गेला असता आरोपी गणेश पारे याने त्याला बोलावून घेतले. तेथे पारे याच्यासह अन्य साथीदारांनी त्याला स्टेटसवर ठेवलेल्या ॲट्रॉसिटी संदर्भातील बातमीवरून शिवीगाळ करीत मारहाण केली. “तु लई अँट्रॉसिटीचे स्टेटस टाकतोस, आता आमच्यावर टाक, पाहू आम्हाला जामिन मिळतो का नाही,” असे म्हणत आरोपींनी धमकीही दिली.

मारहाणी दरम्यान सुजित पवारच्या हातातील अंगठी काढून घेण्यात आली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याने प्रसंगावधान दाखवत आरोपींना धक्का देऊन स्वतःचा जीव वाचवला.

या घटनेवरून राहुरी पोलिस ठाण्यात गणेश पारे (रा. खंडाबे खुर्द), नितीन भाउसाहेब कदम (रा. धामोरी खुर्द), नितीन शाम जंगम व भाऊराव शिवाजी उगले (दोघे रा. धामोरी बुद्रुक) या चौघांविरुद्ध गुन्हा रजि. नं. १०३९/२०२५ भा.दं.सं. कलम ११५(२), ३५१(२), ३०४, ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास श्रीरामपूर विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर करीत असून, आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!