राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारासंदर्भातील गंभीर प्रकरणात राहुरी पोलीसांनी तातडीने कारवाई करून आरोपीस अटक केली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 917/2025 अन्वये कलम 64, 74, 75 तसेच इतर भारतीय न्यायसंहितेतील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत शोधमोहीम हाती घेतली. या शोधात संबंधित आरोपी यश अनिल डौले (वय 27, रा. जोगेश्वरी आखाडा) याचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून आरोपीला औपचारिकपणे अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीस उद्या माननीय न्यायालयासमोर हजर करून पोलिस कोठडी (PCR) घेण्यात येणार असून, पुढील तपास अधिक काटेकोरपणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर गुन्ह्याचा तपास मा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हवालदार सतीश आवार, पोलीस नाईक कुदळे हे करीत आहेत
अल्पवयीन मुलीस सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार प्रकरणातील आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद

0Share
Leave a reply












