तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : जीवनात जिद्द,परिश्रम, चिकाटी यांची सांगड घालून वाटचाल केल्यास जीवनातील अशक्यप्राय गोष्ट साध्य करण्यास वेळ लागणार नसल्याची भावना धाराशिव जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आर .एस. गायकवाड यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार स्वामी हे होते.
अणदूर येथील युवा उद्योजक करबसप्पा उर्फ पप्पू धमुरे यांच्या जन्मदिना निमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.जीवन क्षणभंगुर असून आहे त्या क्षणाचा समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत विविध उपक्रम खऱ्या अर्थाने राबवून जीवन सार्थक करण्याची गरज असल्याची भावना स्वामी यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना धमूरे म्हणाले की, या सत्काराने आपण भारावून गेलो असून आगामी काळात सकारात्मक वाटचाल करून वेळेचे सोने करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती बालाजी मोकाशे ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, सुधीर सिंग ठाकूर , ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे ,सामाजिक कार्यकर्ते मधुकर अण्णा बनपट्टे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार गायकवाड, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बेंद्रे, गुणवंत मुळे, शिवशंकर तिरगुळे , ऋषी कांबळे, शंकर गायकवाड, मारुती सोनटक्के, बालाजी पापडे, गणेश पुजारी, ओम भालेकर, नितीन गळाकाटे प्रशांत मुळे शिवानंद गायकवाड, अजित वचने पाटील सह बहुसंख्य युवक उपस्थित होते.
Leave a reply













