राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पाच महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या काॅलेज तरुणीला तू मला खूप आवडते, मला तूझ्या सोबत लग्न करायचे आहे. असे गोड बोलून तीच्या सोबत मोबाईलवर फोटो काढले. त्यानंतर तीला लॉजवर नेवून दोघांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्या काॅलेज तरुणीवर बलात्कार करण्यात आला.
या घटनेतील एक १७ वर्षे १ महिना वय असलेली अल्पवयीन तरुणी राहुरी शहर हद्दीत राहत असून ती १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पिडीत काॅलेज तरुणीची एप्रिल २०२५ मध्ये यश डौले याचे सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर दोघांचे ऐकमेका सोबत फोनवर बोलणे सुरु झाले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. दि. २८ जुलै २०२५ रोजी ती काॅलेज तरुणी दुपारी १२ वाजता काॅलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी राहुरी बस स्थानक समोरील हायवे रोडवर उभी असताना तेथे आरोपी तरुण आला. तो तरुणीला म्हणाला कि, मला तुझ्या सोबत बोलायचे आहे.
आपण शनिशिंगणापुर येथे जावु व तिकडेच निवांत बोलु, असे म्हणुन आरोपीने तरुणीला मोटार सायकलवर बसवून राहुरी ते शनिशिंगणापुर रोडवरील उंबरे गावचे शिवारात असलेल्या हॉटेल राधाकृष्ण मधील एका रुम मध्ये घेवुन गेला. तेथे गेल्यावर तरुणीने आरोपीला विचारले की, तु मला येथे का घेवुन आला आहे. त्यावर तो मला म्हणाला की, तु मला खुप आवडते. मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. असे म्हणुन त्याने काॅलेज तरुणीला मिठीत घेऊन विनयभंग केला. आणि दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून तीला लज्जा उत्तन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर तु जर कोणाला काही सांगीतले तर तुझे फोटो व्हायरल करेल, अशी आरोपीने धमकी दिली.
त्यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.१५ वाजता काॅलेज सुटल्यानंतर आरोपी यश याने काॅलेज तरुणीला फोन करुन राहुरी विदयापीठ येथे बोलावले होते. तु जर तेथे आली नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी रिक्षाने राहुरी विद्यापीठचे गेट जवळ गेली. तेथे आरोपी यश हा मोटार सायकलवर आला. त्याने काॅलेज तरुणीला मोटार सायकलवर बसवून तीला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारातील अनिकेत लॉजवरील एका रुममध्ये घेवुन गेला. तेथे आरोपी तरुणीला म्हणाला मला २ हजार रुपए दे. तेव्हा तरुणी म्हणाले माझेकडे पैसे नाहीत, असे म्हणाली असता त्याने तरुणीला हाथाचे चापटीने मारहान करुन शिवीगाळ केली. आणि मला म्हणाला तु माझ्या काय कामाची नाही. तू जा येथुन असे म्हणाला असता तरुणी रूममधुन बाहेर जात असताना आरोपीने तीला हाथाला धरुन रुममध्ये ओढले आणि म्हणाला की, मला तुझ्याशी सेक्स करायचा आहे. तेव्हा तरुणीने त्याला नकार दिला. त्यावर आरोपी म्हणाला की, तु जर माझ्याशी सेक्स केला नाहीतर मी तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देवुन आरोपी यश याने पिडीत काॅलेज तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तु जर कोणाला काही सांगीतले तर तुझे फोटो फेसबुक व इंस्टाग्रामवर व्हायरल करेल व तुझी इज्जत घालवेल, अशी धमकी दिली.
घरी आल्यानंतर पिडीत काॅलेज तरुणीने घडलेला प्रकार तीच्या आईला सांगीतला. त्यानंतर काॅलेज तरुणीने नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डौले, रा. जोगेश्वर आखाडा, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ९१७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ७४, ७५ (२), ७६, ११५ (२), ३५१ (२), ३५२ तसेच बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ४, ८, १२ मारहाण, विनयभंग तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a reply













