पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालय ढवळपुरी तसेच ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महादेव मंदिर येथे श्रावणी सोमवार समाप्तीनंतर मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता हा उपक्रम राबवण्यात येतो.
विद्यापीठ अंतर्गत धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालय ढवळपुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. शेख जमील सर तसेच प्रा. अतुल मोरे सर, प्राध्यापक वाव्हळ सागर सर , प्रा. जयश्री भोंडवे मॅडम, प्रा. कोकाटे अक्षदा मॅडम, उपस्थित होत्या तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे तेथील लोकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत श्री ढोकेश्वर मंदिर परिसर स्वच्छता मोहीम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयाचे कौतुकाचे काम

0Share
Leave a reply












