SR 24 NEWS

क्राईम

शनिशिंगणापूर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, शनिशिंगणापूर पोलिसांनी कारवाई करत 21, 28, 000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Spread the love

नेवासा प्रतिनिधी / मोहन शेगर : दि. १ जुलै रोजी रात्री पोसई कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल श्री. पवार, अजय ठुबे यांचे पथक शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांनी खरवंडी शिवारात छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवर विनानंबरचा लाल रंगाचा डंपर थांबवून पाहणी केली असता, सदर डंपरमध्ये वाळू मिळून आली. डंपर चालकास विचारपुस करण्याचा प्रयत्न केला असता तो डंपरच्या पाठीमागून पळून गेला. पळत असताना त्याचा मोबाईल त्याच्या खिशातून पडला, तो पोलिसांना मिळुन आला.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना समजले असता ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे तीन ब्रास वाळू असलेला डंपर व आरोपीचा मोबाईल असा मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी विना नंबरच्या डंपरवरील अनोळखी चालक व चालकास घेऊन जाणारा यांच्याविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात बिएनएस चे कलम ३०३ (२), ३५२, १२६(२), २२१, ३ (५) प्रमाणे पर्यावरण कायदा अधिनियमचे कलम ३, १५ व गौण खनिज कायदा कलम ४, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीकडून विनानंबरचा सोळा लाख रुपये किंमतीचा डंपर, त्यामध्ये अठरा हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळू, एक दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एक पांढऱ्या रंगाची एमएच १४ इसी २१४० नंबरची पाच लाख रुपये किंमतीची कार असा एकूण एकविस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी तीन तासांच्या आत अटक केली. सदरची कारवाई आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस करीत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!