श्रीरामपूर प्रतिनिधी / जीतू शिंदे : दिनांक 02/07/2025 रोजी पोनि. नितीन देशमुख साो. यांचे आदेशाने तपास पथक पोलीस स्टेशन हद्दित अवैध्य धंदयावर कारवाई करणेकामी पोलीस स्टेशन हद्दित पेट्रॉलिग करीत असतांना तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लता महादु राऊत यांचे मालकीच्या घरामध्ये कदम वस्ती, भैरवनाथ नगर श्रीरामपूर येथे बनावट देशी भिंगरी संत्रा दारु बनवत आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती पोनि. नितीन देशमुख साो. यांना कळवुन त्यांचे आदेशाने तात्काळ सदर ठिकाणी पंचासह छापा टाकला असता तेथे आरोपी नामे 1) मोसीन इक्बाल सय्यद, वय 24 वर्षे, रा. संजयनगर पाणी टाकीजवळ वॉर्ड नं.02 श्रीरामूपर जि. अहिल्यानगर 2) अरबाज अनिस मलंग, वय 25 वर्षे, रा. गुलशन चौक जवळ वॉर्ड नं.02, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर 3) अन्वर शब्बीर शहा, वय 47 वर्षे, रा. संजयनगर डावखर मैदान, बर्फ कारखान्याजवळ वॉर्ड नं.01, श्रीरामूपर जि. अहिल्यानगर हे बनावट देशी भिंगरी संत्रा तयार दारु बॉटलमध्ये भरुन पॅक करुन त्याला लेबल लावताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सदरची देशी भिंगरी संत्रा दारु बनवण्याकरीता लागणारा परवाना आहे का असे विचारले असता त्यांनी आमच्याकडे कोणताही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले.
तसेच बनावट देशी भिंगरी संत्रा दारु बनवण्याकरीता लागणारे स्पिरीट व इतर साहित्य कोणाकडुन घेतले व सदरचे घर कोणाचे काणाचे आहे असे विचारले असता त्यांनी आरोपी साथिदार नामे 4) प्रमोद बाळासाहेब फुलारे व 5) राहुल बाळासाहेब फुलारे रा. लोंढे मळा, खबडी जवळ, वॉर्ड नं.01, श्रीरामपूर यांच्या कडुन बनावट देशी भिंगरी संत्रा दारु बनवण्याकरीता लागणारे स्पिरीट घेत असल्याचे सांगितले. तसेच सदच्या बॉटल पॅक करण्यासाठी लागणारे झाकण हे शिर्डी येथुन आरोपी साथिदार नामे 6) महेश गाँड ऊर्फ आण्णा रा. शिर्डी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याकडुन घेत असल्याचे सांगितले. तसचे सदरचे घर हे आरोपी साथिदार नामे 7) लता महादु राऊत, रा. वॉर्ड नं.02, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांचे असल्याचे सांगितले.
तरी सदर अटक आरोपीताकडुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1)20230/-रु.कि. 289 बनावट देशी दारु भिंगरी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या सिलबंद बाटल्या प्रत्येकी 70 रु किंमतीच्या.
2)70,000/- रु. किं.ची. होन्डा अॅक्टीवा मोपेड गाडी तिचा नंबर MH-41 AJ-7340 असा नंबर असलेली बनावट दारु वाहतुक करण्याकरीता वापरत असलेली जुवाकिंअं.
3)50,000/- रु. किंमतीचे बनावट देशी भिंगरी संत्रा दारु तयार करण्यासाठी वापरत असलेले स्पिरिट व पाणी मिक्स करुन तयार केलेले रसायन, अर्धे कापलेले निळया रंगाच्या आडव्या टिपाडामध्ये भरलेले जागीच नष्ट केले.
4)26,090/- रु.किंमतीचे बनावट देशी भिंगरी संत्रा तयार दारु भरण्याकरीता भिंगरीच्या रिकाम्या बॉटल, झाकण, लेबल, पुठ्याचे पॅकीग बॉक्स, सेलो टेप, सिल पॅकीग मशिन, रब्बर टॅम्प मशिन, प्लॉस्टिक ड्रम, प्लॉस्टिक टिपाड, बनावट देशी भिंगरी संत्रा लेबल, काचेची डिग्री, इलेक्ट्रीक मोटर, प्लास्टिक पाईप असा एकुण मुद्देमाल. 1,66,320/- रु. किंमतीचा मुद्देमाल.वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीताविरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. 644/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,318 (4),338, सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम 65 (ई), (ड), 80,81, 98, 104 प्रमाणे गुन्हया दाखल करण्यात आला असुन आरोपी क्रं. 01 ते 03 यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोहेकॉ दादासाहेब लोंढे, पोकॉ/ संपत बडे, पोकों/अमोल पडोळे, पोका संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकॉ/आजिनाथ आंधळे, पोकों/ अकबर पठाण, पोकों/सांगर बनसोडे, पोकों/राहुल पौळ, चापोकों/ बाळासाहेब गिरी, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलयांचे पोहेकॉ सचिन धनाड तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाचे निरीक्षक श्री. एस.एस.हांडे, दुय्यम निरीक्षक वाय.बी. पाटील, सह्याक दुय्यम निरीक्षक एस.एस. गारळे, जवान यु.जी. काळे, जवान अमीन सय्यद, जवान नि.वा.चा. एस.एस. कासुळे, महिला जवान प्रमीला कासार यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.
श्रीरामपूर शहर पोलीसांकडून बनावट देशी भिंगरी संत्रा दारुचा कारखाना उध्दवस्त, 1,66,230/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपींना अटक

0Share
Leave a reply













