अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मावा बनवणाऱ्या कारखान्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून तब्बल २ लाख ७९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल करून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावा तयार करण्यासाठी दोन मशीन मिळाल्या गोरक्षनाथ संजय मुर्तडक (रा. संदेशनगर) व इतर तिघे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीराम चौकात असलेल्या नवनाथ बंगला (संदेश नगर), तसेच नवनाथ पान स्टॉल येथे सुगंधी तंबाखू तसेच मावा विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून मावा तयार करण्यासाठी दोन मशीन मिळून आल्या.
तसेच सुगंधी तंबाखू, तत्सम पदार्थ असा एकूण २ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, अक्षय भोसले,जालिंदर दहिफळे, दीपक जाधव, विजय ढाकणे यांच्या पथकाने केली.
तोफखाना हद्दीत मावा बनवणारा कारखाना उध्वस्त ; पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाची कारवाई

0Share
Leave a reply












