राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे कार्य केल्यास त्याला त्याचे फलित ही योग्य मिळते. त्याचप्रमाणे प्रकाश राजाराम धनवटे यांनी ही या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे कार्य केले. तेव्हा इतरांनी ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेचे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राहुरी येथील डॉ. तनपुरे कारखान्याशी संलग्न असणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी व भाग शाळा उंबरे या शाळेचे उपशिक्षक प्रकाश राजाराम धनवटे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल २८ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे हे होते. बालब्रह्मचारी मुक्तानंदगिरी महाराज( वेल्हाळे तालुका संगमनेर) डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रावसाहेब यादवराव तनपुरे(चाचा)आणि माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब रामराव शिंदे यांच्या शुभहस्ते सौ/श्री. पुष्पा प्रकाश धनवटे या दाम्पत्याचा गौरव चिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
रावसाहेब यादव तनपुरे(चाचा) यांनी आपल्या भाषणात शिक्षक हा समाजातील लोकशिक्षक असतो असे नमुद केले., शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचा दिवस साजरा होणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही मोठी बाब आहे. शिक्षक भविष्यातील पिढी घडवतात. त्यांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण विद्यार्थी करतात विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण होण्याचे कार्य उपशिक्षक प्रकाश धनवटे यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आहे.
आप्पासाहेब शिंदे बोलताना म्हणाले, धनवटे यांनी आपल्या शिक्षक जीवनात विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या घडणीसाठी अमूल्य योगदान दिलं. त्यांनी शिक्षकी पेशाला फक्त नोकरी म्हणून पाहिलं नाही, तर विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणं, त्यांची स्वप्नं उंचावणं आणि त्यांना मदत करणं हे आपलं ध्येय मानलं. विशेषतः गरीब व वंचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आर्थिक आणि शैक्षणिक मदत केली.
याप्रसंगी डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक भारत वारुळे, किसन जवरे, भास्कर ढोकणे प्रमोद तारडे ,सौ. वैशाली तारडे, तसेच डॉ. तनपुरे कारखान्याचे इतर संचालक, ब्राह्मणीच्या सरपंच सुवर्णाताई सुरेश बानकर, युवा नेते सौरभ उंडे, बाप्पू अण्णा तनपुरे, संभाजी राजे तनपुरे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संभाजी लक्ष्मण गाडे, राहुरी तालुक्यासह देहरे,शिंगवे नांदगाव,विळद येथील ग्रामस्थ आप्तेष्ट, नातेवाईक,मित्रमंडळी,तसेच शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर वृंद सन्माननीय पदाधिकारी ब्राम्हणीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री कैलास डोके, श्री दुधे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री नानासाहेब जाधव, प्रकाश धनवटे यांचा जीवनपट पी.के पवार, सन्मानपत्र वाचन श्री जगदाळे तर कार्यक्रमाचा समारोप आभार श्री कदम यांनी केला.
उपशिक्षक प्रकाश राजाराम धनवटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न:प्रामाणिकपणे कार्य केल्यास त्याचे योग्य फलित मिळते- अरुण तनपुरे

0Share
Leave a reply













