राहुरी (प्रतिनिधी) – अहिल्यानगर येथील श्री साईदास परिवार ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण मासानिमित्त आयोजित अहिल्यानगर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे शनिवारी राहुरी तालुक्यातील गुहा येथील वाबळे वस्तीवरील श्री साई मंदिरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
गेल्या तब्बल २२ वर्षांपासून हा पारंपरिक सोहळा सातत्याने पार पडतो आहे. यावर्षीही सुमारे ५०० ते ६०० साईभक्तांच्या उपस्थितीत पालखीचे आगमन झाले. वाबळे परिवारासह स्थानिक ग्रामस्थ व साईभक्तांनी पालखीचे स्वागत करताना परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
यावेळी पालखी श्री साई मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. भजन, कीर्तन, आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर भाविकांसाठी वाबळे परिवाराच्यावतीने चहापाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान साईदास परिवार ट्रस्टचे अध्यक्ष अजय काळे तसेच शंकर बोरुडे, निशिकांत शिंदे, संजय बनसोडे, लक्ष्मीकांत तिवारी, विजय चौधरी, प्रकाश म्हस्के आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रेरणा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे, प्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे, प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, व्हाईस चेअरमन प्रा. वेणुनाथ लांब, प्रेरणा विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक उर्हे, संचालक विष्णुपंत वर्पे, अशोक शिंदे, राजेंद्र गांडुळे, शिवाजी उर्हे, अशोक चंद्रे, गोपीनाथ वर्पे, चंद्रभान वाबळे, प्रा. विशाल वाबळे, प्रशांत वाबळे, सिद्धार्थ वाबळे, बंटी वाबळे, सुनील वाबळे, अनिकेत वाबळे यांच्यासह प्रेरणा पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री. चंद्रे, मल्टिस्टेटचे जनरल मॅनेजर अनिल वर्पे, शाखा मॅनेजर महेश सिनारे आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे गुहा येथील श्री साई मंदिरात मोठ्या उत्साहात स्वागत

0Share
Leave a reply












