SR 24 NEWS

राजकीय

देशाचा ग्रामविकासाचा पाया हिवरे बाजारने घातला मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर 

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी  / वसंत रांधवण : भारतीय स्वातंत्र्य दिन, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हिवरे बाजार येथे ‘एक वृक्ष मातेसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या उपक्रमाचे हिवरे बाजार ग्रामस्थांनी आयोजन केले होते.यावेळी ना.विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांसह वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेकरीता विकसित करण्यात आलेल्या ‘ज्ञानोबा-तुकोबा’ सभागृहाचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना ना.विखे पाटील म्हणाले, देशाचा ग्रामविकासाचा पाया हिवरे बाजारने घातला. हिवरे बाजार गावाला पहिला आदर्श गाव पुरस्कार सन १९९७ साली माझ्या हातून दिल्याची आठवण यानिमित्ताने सांगितली. गावाने केलेल्या निरंतर विकासात्मक वाटचालीचे कौतुक करून ग्रामविकास आणि वृक्ष संवर्धनामध्ये संतांनी दिलेले विचार कृतीत उतरविण्याचे काम हिवरे बाजार गावाने केल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदनकेले. ग्रामस्थांनी श्रमदान व लोकसहभामुळे हिवरे बाजारच्या विकासात सातत्य राहिले असून गाव जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण देश विदेशाला मार्गदर्शक ठरले आहे.

यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२५ मधील गुणवंत विद्यार्थ्याचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांना यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत एन.सी.सी.संचलन करून स्वागत केले.ना.विखे पाटील यांचा ग्रामस्थांतर्फे शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग, श्री. अनिल मोहीते, प्रा. विश्वनाथ कोरडे, यांच्यासह या वेळी सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, राजू सहादू ठाणगे मेजर, मंगेश ठाणगे मेजर, दामोदर ठाणगे, विठ्ठल ठाणगे, एस. टी. पादीर, रो.ना.पादीर, अर्जुन पवार, अशोक गोहड यांच्यासह गावातील महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!