राहुरी खुर्द (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव टेकडीवर पारंपरिक भव्य भंडाऱ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.संध्याकाळी सहा ते सात या वेळेत गावातील वारकरी संप्रदायातील हरिभक्तांनी हरिपाठ व गवळणी सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले.
त्यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यामध्ये महिला भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती. उपवास सोडण्याचा कार्यक्रम देवाधिदेव महादेव व माता पार्वतीच्या साक्षीने पार पडला, ज्यामुळे गावात एक नवा पायंडा पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या महाप्रसादाचा लाभ तब्बल दोन हजार ग्रामस्थांनी घेतला.
भंडारा यशस्वी होण्यासाठी राजमाता अहिल्या मित्र मंडळ, महादेव मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, बुवा शिदबाबा मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, लक्ष्मी माता मित्र मंडळ, माऊलाई मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, दुर्गा माता मित्र मंडळ, अल्पसंख्याक मित्र मंडळ यांसह गावातील अनेक मंडळांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, तालुका उपाध्यक्ष रमेश खेमनर, तसेच गावातील मान्यवर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, पाणीपुरवठा सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, यात्रा समिती अध्यक्ष, महादेव मित्र मंडळ अध्यक्ष आणि अनेक शिवभक्त उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान चोख बंदोबस्त करणाऱ्या स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे कमलेश शेवाळे व भारत नजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष आलमभाई शेख, महिला पोलीस मित्र मंदा बाचकर, नंदा कुसळकर, सुनीता मकासरे यांनी सेवा दिली तसेच या कार्यक्रमास गावचे माजी उपसरपंच उमेश बाचकर, राहुरी तालुका फोटो ग्राफर असोसिएशनचे तालुका उपाध्यक्ष जालिंदर गडदे, चंद्रकांत सुसे, पुष्पा बाचकर, सविता गडदे, डॉ.आकांक्षा बाचकर यांनी सत्कार केला.
गोटुंबे आखाडा येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भव्य भंडारा उत्साहात पार, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

0Share
Leave a reply












