तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी तुळजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड यांचा 59 वा वाढदिवस असून, बैठकीला विशेष उत्साहाचे वातावरण लाभणार आहे.आगामी संभाव्य नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर, जिल्हा प्रभारी ॲड. रमेश गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे, फुले-आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, तसेच धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस जिल्हा कार्यकारिणी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी जनरल कामगार युनियन, फुले-आंबेडकर विद्वत सभा या सर्व शाखांचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच आजी-माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड, जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे आणि तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूरमध्ये ; जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर राहणार उपस्थित

0Share
Leave a reply












