राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : देशाचा 79 वा स्वातंत्र दिन संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होत आहे. या अंतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2025 या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे प्रत्येक भारतीय कुटुंबाला भारत देशाचा ध्वज फडकविण्याची संधी मिळते व त्यामुळे एकता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वृध्दिंगत होते. तरी सर्वांनी या हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पदव्युत्तर महाविद्यालयापासून सुरु झालेली रॅली कृषि अभियात्रिकी महाविद्यालयामार्गे काढण्यात आली होती या रॅलीची सांगता प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आली. यावेळी रॅलीला मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. सुनील भनगे, उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.टी. गायकवाड, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. रवि आंधळे, डॉ. संजय कोळसे, डॉ. देविदास खेडकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, पदव्युत्तर महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे, डॉ. संगीता शिंदे, डॉ. अधिर आहेर, लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, पदव्युत्तर महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हर घर तिरंगा या अभियानाविषयी क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी यांनी माहिती दिली.
Leave a reply













