SR 24 NEWS

क्राईम

राहुरी पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट यशस्वी; १० नॉन बेलेबल वॉरंटवरील आरोपी अटकेत, हातभट्टी दारू विकणाऱ्या चौघांवर कारवाई

Spread the love

राहुरी (आर. आर. जाधव) – राहुरी पोलिसांनी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजल्यापासून ते २ ऑगस्टच्या मध्यरात्री १:०० वाजेपर्यंत “ऑपरेशन ऑल आऊट” अंतर्गत मोठी मोहीम राबवली. या कारवाईत नॉन बेलेबल वॉरंटवरील १० आरोपींना अटक करण्यात आली असून गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या मोहीमेदरम्यान एकूण १०७ समन्स, ३२ बेलेबल वॉरंट आणि २४ नॉन बेलेबल वॉरंटांची बजावणी करण्यात आली. यामध्ये खालील १० आरोपींना अटक करण्यात आली:

1. मनोज नरहरी उदावंत (रा. शिवाजी चौक, राहुरी बु.)

2. सुनिल चांगदेव शेलार (रा. म्हैसगाव)

3. सोपान रावसाहेब करमड (रा. घोरपडवाडी)

4. सचिन उर्फ किरण दत्तु शेलार (रा. टाकळीमियां, सोनवने वस्ती)

5. आनंद लखीचंद देसरडा (रा. देवळाली प्रवरा)

6. राहुल कैलास जवरे (रा. वांबोरी)

7. तुषार रावसाहेब माने (रा. धामोरी)

8. नितीन साहेबराव जंगले (रा. चेडगाव)

9. बाबासाहेब  तमनर (रा. तमनर आखाडा)

10. किशोर भाऊसाहेब वाघुर वाघ (रा. मुलंनमाथा)

सदर सर्व आरोपींना अटक करून त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, गावठी हातभट्टीची तयार दारू विनापरवाना विक्री करणाऱ्या तीन आरोपींवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपी:

1. चंद्रकला राजू शिंदे (रा. दिग्रस)

 

 

2. नवनाथ नारायण पिंपळे (रा. सात्रळ)

3. दीपक बाळासाहेब पवार (रा. वांजुळपोई)

 

यांच्याकडून सुमारे २०० लिटर, २०,००० रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. याशिवाय, विजय उगले (रा. यवतमाळ) हा संशयास्पदरित्या मोटरसायकलवर फिरताना आढळल्याने त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

राहुरी पोलिसांचे आवाहन – ज्या व्यक्तींविरुद्ध न्यायालयीन खटले सुरू आहेत त्यांनी समन्स प्राप्त होताच न्यायालयात उपस्थित राहावे. अन्यथा अनुपस्थित राहिल्यास बेलेबल वॉरंट, आणि त्यावरही अनुपस्थित राहिल्यास नॉन बेलेबल वॉरंट निघू शकते व अटकेला सामोरे जावे लागू शकते.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!