राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती लोणी खुर्द येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव ता. वळवा, जि. सांगली येथे झाला होता. त्यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, जनामनात आपले नाव कोरलेले, मराठी साहित्यिक म्हणून प्रसिद्ध.
मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे ही त्यांनी केलेले. घराघरात पोहचलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज प्रत्येक गावागावात उत्सहात साजरी होतं आहे. लोणी येथील बजरंग दलाचे अध्यक्ष सागर राक्षे, प्रसाद घोगरे, विकी राक्षे, यांनी कार्य पार पाडले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन दादा आहेर, परशुराम आहेर, रामनाथ खरात, स्वप्निल साळवे, गणेश जगधने, भाऊसाहेब जगधने, विजय पवार, किरण चव्हाण, विशाल आव्हाड, रोहित क्षीरसागर, अमन शेख, संकेत तांबे, विठ्ठल ठोंबरे .कृष्णा वाघ, आकाश सोनवणे, राजेंद्र लोंढे उपस्थित होते. तसेच हिना उबाळे, सागर उबाळे हे देखील उपस्थित होते.विशेषता या कार्यक्रम दरम्यान लहान मुले, पुरुष, महिला सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
Leave a reply













