तळोदी (चंद्रपूर) / रोशन खानकुरे : तळोदी शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा व धोकादायक खड्डा निर्माण झाल्यामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला होता. अपघाताची शक्यता प्रबळ असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. मात्र, अशा परिस्थितीत ‘स्वप्न झेप अकादमी’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान राखत कौतुकास्पद पाऊल उचलले. कोणत्याही अधिकाऱ्याची वाट न पाहता या विद्यार्थ्यांनी खड्ड्याजवळ बॅरिकेट्स लावून वाहन चालकांना सतर्क केले. या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळून अनेकांचे जीव वाचले.
विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ आपली जबाबदारी समजून ही कृती केली, हे विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान, हा खड्डा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तयार झाल्याची स्थानिकांची तक्रार असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षच झाल्याचे दिसून येते. ‘स्वप्न झेप अकादमी’च्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि सतर्कता हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
हायवेवरील जीवघेणा खड्डा टळला विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे; ‘स्वप्न झेप अकादमी’चे विद्यार्थ्यांचे कौतुक

0Share
Leave a reply












