पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : आदर्श गाव हिवरे बाजार येथे महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती महामहीम नामदार प्रा.राम शिंदे साहेब यांना महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या अडचणी व त्यावरील कार्यवाही शासनाच्या वतीने लवकरात लवकर करावी यासाठी मेंढपाळ विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष इंजि.डी.आर.शेंडगे व मेंढपाळ बांधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा केली.उपस्थित केलेले मुद्दे शेळ्या,मेंढ्या,घोडे व मेंढपाळ कुटुंब यांचा विमा शासनाने मोफत करावा, मंजुर फिरता दवाखाना प्रत्येक तालुक्यात कार्यान्वित करावा.
हिंस्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी साधने उपलब्ध करून द्यावीत,मोफत तंबु दयावेत.शासनाने वाड्या वस्त्या वर पक्के रस्ते तयार करावेत.यासमयी उपस्थित पद्मश्री पोपटराव पवार, आमदार काशिनाथ दाते सर,इंजि.डी.आर.शेंडगे ,लक्ष्मणराव कोकरे, म्हस्कु मामा टकले, शिवाजीराव लकडे लक्ष्मण कोळपे व मान्यवर मेंढपाळ बांधव
Leave a reply













