श्रीरामपूर प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : केअर फोर सोसायटीज हेल्थ श्रीरामपूर त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन,विकास संस्था व श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक यांच्या आयोजित आयुर्वेदिक शिबीर उत्साहात संपन्न. दिनांक ६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या हाडांचा ठिसूळपणा व हिमोग्लोबिन रक्तगट मोफत तपासणी शिबिराचा 200 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराची सुरुवात धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. यावेळी नगरसेविका स्नेहल खोरे त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन विकास संस्थेचे डॉक्टर महेश शिरसागर व केअरफोर सोसायटीज हेल्थ चे सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ पत्रकार चेडे काका उपस्थित होते.
यावेळी आयुर्वेद तज्ञ डॉक्टर रितू लखोटिया यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला मार्गदर्शन व उपचार दिले यावेळी दृष्टी लॅबचे सचिन गवारे यांनी मोफत नागरिकांचे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी केली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी केअर फॉर सोसायटीज हेल्थच्या अध्यक्ष प्रिया शहा, उपाध्यक्ष निशा सरोदे,दिपाली माळवे,विरळ ठक्कर, जयश्री पिंगळे, स्नेहलता कुलथे, सोनल त्र्यंबके,सीमा भालेराव,उषा लकडे, भावना धूस,अर्चना सोनजे, हर्षिता लुल्ला, भारती रासकर, अपर्णा तांबडे, प्रिया पवार व इतर पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले तसेच श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक्स चे श्री संदीप त्र्यंबके,सुभाष कुऱ्हे विठठल ठोंबरे, प्रसन्ननाथ गुप्ता व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
केअर फोर सोसायटीज हेल्थ त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन विकास संस्था व श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक यांच्या आयोजित आयुर्वेदिक शिबीर उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply












