पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा. वैभव सुधाकर गावडे यांची अहिल्यानगर युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमागे समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे यांचे मार्गदर्शन असून, महान राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व महापराक्रमी राजा श्रीमत मल्हारराव होळकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजहिताच्या कार्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे.
संत बाळुमामा यांच्या कृपा आणि आशीर्वादाने ही जबाबदारी लाभली असून, गावडे यांनी समाजातील शेवटच्या वाडी-वस्तीतील, डोंगराळ भागातील धनगर बांधवांपर्यंत पोहचून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याची शपथ घेतली आहे. त्यांचे मुख्य ध्येय धनगर समाजाला न्याय्य हक्काचे आरक्षण मिळवून देणे हे असून, त्यासाठी ते संघर्षशील राहणार आहेत.या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष मा. अनंत बनसोडे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग दातीर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पोपटराव महारनवर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मरणदिनी या सेवाभावी जबाबदारीची सुरुवात होत असल्यामुळे ही घटना अधिकच प्रेरणादायी आणि पवित्र ठरत आहे.ईश्वरचरणी हीच प्रार्थना की गावडे यांच्या माध्यमातून समाजाची व्यापक सेवा घडो.
धनगर समाज संघर्ष समितीच्या अहिल्यानगर युवा जिल्हा उपाध्यक्षपदी वैभव गावडे यांची नियुक्ती

0Share
Leave a reply












