मुंबई कांदिवली पश्चिम./ भारत कवितके मुंबई : सामाजिक चळवळी मध्ये सर्वात मोठे योगदान शाहू महाराजांचे आहे असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी केले.शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६वाजता बोरीवली येथील फुलपाखरू उद्यान मधील शाहू महाराज संस्कार केंद्र, स्वर्गीय शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह बोरीवली पूर्व येथे राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र आणि विमुक्त भटके जनजाती विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज जयंती निमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ,व पद्मश्री दादा इदाते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.यावेळी दहावी परिक्षेत विशेष गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना विशेष शालेय वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते, भारत कवितके यांचा पद्मश्री दादा इदाते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सहदेव रसाळ यांचे प्रास्ताविक संस्थेचे कार्य वाहक गिरीधर साळुंखे यांनी वाचून दाखविले.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते गणेश खणकर यांनी सांगितले की,” या सभागृहाच्या बांधकामावेळी खूप संघर्ष करावा लागला, येणाऱ्या पिढ्यांना पद्मश्री दादा इदाते यांचे कार्य समजेल.समाजाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे कार्य दादांचे आहे.
माजी आमदार माजी मंत्री विजय भाई गिरकर यांनी सांगितले की ” शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार हा चांगला कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला शाहू महाराज बी.बी.डी.चाळीत भेटले तो प्रसंग विजय भाई गिरकर यांनी सांगितला.पद्मश्री दादा इदाते यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की,” सामाजिक चळवळी मध्ये सर्वात मोठे योगदान शाहू महाराजांचे आहे, सामाजिक समिकरण बदलून शाहू आंबेडकर फुले यांचा महाराष्ट्र झाला.
संधी मिळाली तर कर्तृत्व सिद्ध करता येते, सामान्य माणसाला शाहू महाराजांनी अधिकार दिला.सामाजिक चळवळीत अडचण दिसली की शाहू महाराज धाऊन जात असत.’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंखे यांनी केले.या कार्यक्रमांत पद्मश्री दादा इदाते, माजी आमदार विजय भाई गिरकर, श्रीकुमार शिंदे, गणेश खणकर, सहदेव रसाळ, देवीदास राठोड अर्चना लष्कर, भारत कवितके, विद्यार्थी विद्यार्थिनी,व त्यांचे पालक उपस्थित होते.
Leave a reply














