SR 24 NEWS

जनरल

राहुरी फॅक्टरी परिसरात रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या सुमारे 19 वाहन चालकावर राहुरी पोलिसांची दंडात्मक कारवाई

Spread the love

एसआर 24 न्यूज़ राहूरी / ज्ञानेश्वर सुरशे  : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो. दिनांक 31/05/2025 रोजी राहुरी फॅक्टरी कारखाना येथे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना चे वोटिंग असल्याने पब्लिकने रॉंग साईड गाड्या टाकल्याने ट्राफिक जाम झाल्याने एकूण 19 वाहनांनी रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाड्या घातल्या ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सुमारे 19 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 15,000/- हजार रुपये दंड वसूल केला.

सदर एकोणावीसकी वाहन क्रमांक MH 17 AZ 7573 या वाहनावर कारवाई करताना सदर वाहनातील शिर्डी येथून शिंगणापूर जाणाऱ्या पर्यटकांना सदर चालकास त्यांचे घेतलेले भाडे वापस करायला लावून त्यांना अन्य वाहनाने शिंगणापूर शिर्डी परत च्या प्रवासाचे नियोजन करून देऊन सदर वाहन चालकास कायदेशीर कारवाई करिता माननीय न्यायालयात पाठविण्याची तजवीस ठेवली आहे. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये. तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, पोलीस हवालदार फुलमाळी, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे, सतीश कुराडे, सुरज गायकवाड राहुल यादव, सचिन ताजणे यांच्या पथकाने केली.सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!