SR 24 NEWS

जनरल

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय, मुख्य रस्त्याचे काम थांबवण्याची शिवसेनेची मागणी

Spread the love

अणदूर प्रतिनीधी / चंद्रकांत हगलगुंडे : मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या कामा अगोदर नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकने, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अतिक्रमण काढून गटार व्यवस्था करावी अशा आशयाचे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले असून आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा माजीं शिवसेना तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अणदूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशातून भाविकांचे मोठी वर्दळ असून शैक्षणिक नावाजलेले क्षेत्र आहे. या रस्त्यावरूनच ग्रामीण भाग ही जोडला गेला आहे. सध्या अणदूर मध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून ते काम बंद ठेवून मुख्य रस्त्याचे काम हाती घेतल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम व गटारीचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय मुख्य रस्त्याचे काम करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रत्येक तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्याने मुख्य रस्त्याच्या कामाला ब्रेक लागण्याची भीती मात्र व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!