SR 24 NEWS

जनरल

शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या मद्यधुंद तरुणाचा हॉटेलच्या गच्चीवरून पडून मृत्यू

Spread the love

एसआर 24 न्यूज़ शिर्डी / इनायत अत्तार : शिर्डी लगत निमगाव शिवारात देशमुख चारी जवळील एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा एक खळबळजनक घटना घडली आहे. भाविक म्हणून आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिर्डी जवळील निमगाव हद्दीत एका हॉटेलमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, शेंबा बुद्रुक येथील तीन ते चार तरुण मित्र शिर्डीत दर्शनासाठी आले असता त्यांनी सायंकाळी रूम घेतला आणि त्यानंतर ते दर्शनासाठी निघून गेले. दर्शनानंतर त्यांनी पार्टीचा बेत आखला आणि रात्री उशिरा 12 च्या दरम्यान मध्यधुंद अवस्थेत आणखी मद्य घेऊन ते सगळे हॉटेलला परतले. यातील 23 वर्षीय शुभम सुहास नारखेडे नामक तरुण थेट गच्चीवर पोहोचला आणि तेथून त्याचा तोल जाऊन हॉटेलच्या मागच्या बाजूला कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी सर्वजण झोपेतून उठल्यानंतर मित्र कुठेही दिसत नाही म्हणून शोध घेतला असता हॉटेलच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत दिसून आल्याने इतर मित्रांची तारांबळ उडाली.त्यानंतर पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली असता पोलिस तत्काळ घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी हॉटेल मालक, मॅनेजर, रूम बॉय आणि त्या भाविकांची चौकशी करत त्यांच्यात रात्री काही भांडण वैगरे झाले होते का? याबाबत विचारपूस केली आणि रुग्णवाहिका बोलावत पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!