SR 24 NEWS

जनरल

उन्हाळा सुरू झाला, पक्षांसाठी पिण्याचे पाणी ठेवा, भारत कवितके यांचे आवाहन.

Spread the love

एसआर 24 न्यूज़ प्रतिनिधी : सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याकारणाने चिमणी कावळा व इतर पक्षांसाठी पिण्याचे पाणी थंड ठिकाणी ठेवावे, असे आवाहन मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.जसे मानवी जीवनात पिण्याच्या पाण्याला महत्त्व आहे तसेच पशुपक्ष्यांच्या जीवनात ही पाण्याला महत्त्व पूर्ण स्थान आहे.रानावनात हिंडणारे,बागडणारे पक्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी इकडून तिकडे फिरत असतात.अशा पक्षांसाठी उथळ भांड्यात पाणी भरून ते थंड, सावलीच्या ठिकाणी ठेवावे.उदा.झाड, इमारतीच्या गच्चीवर, आवारात, घरांच्या आडोशाला अशा ठिकाणी पक्षांना पाणी पिण्यासाठी ठेवावे.

रानावनात स्वच्छंदी पणे हिंडणारे, विहरणारे चिमुकले चिमुकले पक्षी आपली तहान भागवू शकतील. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती ने पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे.असे आवाहन मुंबई मधील कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!