SR 24 NEWS

क्राईम

देवळाली प्रवरा येथील ग्राहक सेवा केंद्र चालकाची अपघाताचा बनाव रचून ८० हजारांची फसवणूक; राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : नातेवाईकाचा अपघात झाल्याचा बनाव रचून राहुरी फॅक्टरी येथील एका ग्राहक सेवा केंद्र चालकाची ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार विठ्ठल कदम (वय ३५, रा. देवळाली प्रवरा) हे राहुरी फॅक्टरी येथे स्वतःचे ग्राहक सेवा केंद्र चालवत असताना ही घटना घडली.

आरोपी राहिल युनुस शेख (रा. नाशिक) याने फिर्यादीच्या नातेवाईकाचा अपघात झाला आहे असे भासवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून, त्यांच्या बँक ऑफ इंडियाचे बचत आणि चालू खाते फ्रीज करण्याच्या उद्देशाने एका अनोळखी फोन पे वापरकर्त्याच्या मदतीने ऑनलाईन पैसे पाठवले. या संपूर्ण प्रक्रियेत आरोपीने फिर्यादीची फसवणूक करून त्यांच्याकडून ८० हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली असून, याप्रकरणी २१ जानेवारी २०२६ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!