श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. रवींद्र भाऊसाहेब देठे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री. शामराव नाना चिंधे यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन श्री. रवींद्र देठे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. देठे यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, सर्वसमावेशक व सभासदाभिमुख कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला. सभासदांचे हित जपून संस्थेची प्रगती साधण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास श्री. अंबादास पारखे, श्री.भाऊसाहेब हाळनोर, श्री. शांताराम देठे, श्री. शंकर घोरपडे, श्री. बाळासाहेब पारखे, श्री. बाळासाहेब हाळनोर, श्री. ज्ञानदेव हाळनोर, श्री. आबासाहेब पारखे, श्री. शंकर निबे, श्री. विठ्ठल देठे, श्री. प्रमोद लोंढे, श्री. भागवत खेमनर, श्री. नितीन घोरपडे, श्री. सतीश कानडे, श्री. सतीश हाळनोर, श्री. लक्ष्मण काळे, श्री. दत्तात्रय महानोर, श्री. अरुण घुले, श्री. किशोर देठे, श्री. भीमराज चिंधे, श्री. बाबासाहेब चिंधे, श्री. प्रशांत गाढे, श्री. राजू पारखे, श्री. गणेश देठे, श्री. सुभाष देठे यांच्यासह कुरणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व उपस्थितांचे आभार मा. श्री. शुभम बाबासाहेब चिंधे यांनी मानले.
कुरणपूर विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी रवींद्र भाऊसाहेब देठे यांची निवड, माजी संचालक शामराव चिंधे यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार सोहळा संपन्न

0Share
Leave a reply












