SR 24 NEWS

राजकीय

तमनर आखाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अशोक एकनाथ तमनर यांची बिनविरोध निवड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत अशोक एकनाथ तमनर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच मंदा तुळशीराम तमनर यांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच मनीषा अप्पासाहेब तमनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशोक एकनाथ तमनर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले.

या वेळी तंटामुक्ती अध्यक्ष संतराम दादाराम तमनर, बाबळेश्वर दूध संघाचे संचालक रावसाहेब बाबुराव तमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलास केसकर, माजी उपसरपंच प्रा. संजय तमनर, ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग केशव तमनर, ताराचंद पाटील तमनर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय सदस्य मच्छिंद्र भागवत तमनर, जनार्दन अण्णासाहेब तमनर, भाऊसाहेब किसन तमनर, विलास पंढरीनाथ कोपनर, दत्तात्रय बचकर, राजेंद्र अण्णासाहेब तमनर, भास्कर बाबुराव तमनर, गोरख पंढरीनाथ तमनर, अमोल कोपनर, सावित्रा बापू तमनर उपस्थित होते. प्रशासकीय कामकाजासाठी ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार व क्लर्क रुपेश तमनर यांनी सहकार्य केले.

नवनिर्वाचित उपसरपंच अशोक एकनाथ तमनर यांनी ग्रामविकास, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. याप्रसंगी माजी उपसरपंच मंदा तुळशीराम तमनर यांच्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!