SR 24 NEWS

क्रीडा / खेळ

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी / जावेद शेख :सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नुकताच वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव मा. डॉ. महानंद माने यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. क्षीरसागर, श्री. राजू राठोड, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. तुपविहिरे, उपप्राचार्य श्री. डोंगरे, पत्रकार श्री. जावेद शेख, श्री. राजेंद्र पवार, श्री. जालिंदर बेल्हेकर यांच्यासह विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील सर्व खेळाडूंनी शिस्तबद्ध परेड सादर करून मान्यवरांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथक व झांज पथकाने केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. लेझीम पथकाला शिक्षक श्री. नवनाथ निकाळजे, तर झांज पथकाला श्रीमती वृषाली बाबर व श्रीमती शलाका वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक मानवी मनोऱ्यांच्या प्रदर्शनाने विशेष दाद मिळवली. या सादरीकरणासाठी क्रीडाशिक्षक श्री. दादासाहेब वाघ यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योत संचलन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाच्या रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आल्याने कार्यक्रमात आणखी रंगत आली. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. महानंद माने यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला व क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे नमूद केले.

या क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. योगिता आठरे होत्या. त्यानंतर विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे व नैपुण्याचे सर्व मान्यवर व पालकांनी भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक—श्री. रविंद्र हिवाळे, श्री. पानसंबळ, श्री. अविनाश पंधरे, श्री. हरेश्वर साळवे, श्री. विशाल नांगरे, श्री. हिरामण साळवे, श्री. अजिंक्य भिंगारदे, सौ. अश्विनी जोशी, श्रीमती अनिता वाघमारे, श्रीमती मंजुषा डागवले, श्रीमती अंजुम शेख, श्रीमती आशा उंडे, कु. मोनिका शिंदे, सौ. कल्पना तोडमल, श्रीमती नाजनीन शेख, कु. सुनयना खंडागळे, कु. संजना खंडागळे, श्रीमती खंडागळे, श्रीमती पवार तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!