SR 24 NEWS

इतर

पारनेर तालुक्यातील किन्ही येथील वृद्ध महिलेवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद ; वनविभागाने ‘असे’ राबवले रेस्क्यू ऑपरेशन

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील किन्ही येथील बिबट्या जेरबंद करण्यात आला. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पहिला नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. पकडलेला बिबट्या रात्री उशिरा सुरक्षितरित्या पारनेर येथे नेण्यात आला. किन्ही येथे 2 डिसेंबर रोजी स्व.भागुबाई विश्वनाथ खोडदे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतरही वनविभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने किन्ही – बहिरोबावाडी येथील नागरिकांनी 8 डिसेंबर रोजी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण – नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते.

या आंदोलनादरम्यान उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत तातडीने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी व मंगळवारी नवीन दहा पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले होते. सदरचे पिंजरे ठिकठिकाणी लावण्यात येत असतानाच मंगळवारी कारभारी खोडदे यांच्या शेळीवर बिबट्याने झडप मारून शेळी उचलून नेली होती.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली परंतु बिबट्या आढळला नाही. शेळीचे अर्धवट शरीर ओढ्यामध्ये आढळून आले होते. हाडकीचा तलाव परिसरात पिंजरा लावून त्या पिंजऱ्यात अर्धवट खाल्लेली शेळी ठेवण्यात आली. सायंकाळी 7 वाजता बिबट्या अर्धवट खालेल्या शेळीच्या शोधार्थ आला असता अलगदपणे पिंजऱ्यामध्ये अडकला. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पहिला नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. पकडलेला बिबट्या रात्री उशिरा सुरक्षितरित्या पारनेर येथे नेण्यात आला.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उपवनसंरक्षक अश्विनी दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, अजिंक्य भांबुरकर ,एस.एन.भालेकर, कानिफनाथ साबळे, वनरक्षक निलेश बडे, एम.वाय.शेख, एफ.एस.शेख , बी.एस.दवने,ए.ए.जाधव, एस.के.कार्ले, ए.बी.पठाण, पारनेर रेंजचे कर्मचारी, टाकळी ढोकेश्वर टीम, संगमनेर टीम ,किन्ही येथील ग्रामस्थ, युवक अभिजित खोडदे , दिलीप खोडदे , सुनिल खोडदे, किरण पवार, आदेश परांडे, नितीन खोडदे ,संग्राम खोडदे, जयसिंग खोडदे ,विनोद खोडदे , प्रसाद खोडदे , तेजस मुळे,विनोद खोडदे, गोरक्ष खोडदे, वैभव गिरी , प्रथमेश घोडके, यश घुले, सूरज खोडदे, सुभाष किनकर, विठ्ठल खोडदे आदींनी संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!