SR 24 NEWS

इतर

अश्वी बुद्रुक येथे ‘साई निर्वेद फ्लेक्स बोर्ड’ दुकानाचे मठाधिपती ह.भ.प. दत्त गिरी महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन

Spread the love

प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : अश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे ‘साई निर्वेद फ्लेक्स बोर्ड’ या नवीन फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. कडीत येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शांतवन बनसोडे आणि संजय इनामके यांनी हे दुकान सुरू केले असून, उद्घाटन उबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दत्त गिरी महाराज यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना दत्त गिरी महाराज म्हणाले, “अश्वी परिसरात फ्लेक्स बोर्ड दुकान सुरू झाल्याने स्थानिकांकरिता ही महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी लोणी किंवा संगमनेर येथे जाण्याची वेळखाऊ गैरसोय करावी लागत होती; परंतु आता गावातच सेवा मिळाल्याने वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.”

उद्घाटन कार्यक्रमाला अश्वी व परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रवरा सहकारी बँकेचे संचालक अजय ब्राह्मणे, प्रवरा बँकेचे संचालक भाऊसाहेब वडीतके, कडीतचे सरपंच पांडुरंग शिंदे, यशवंत नागरी पतसंस्थेचे संचालक रामदास वडीतके, तसेच उपसरपंच प्रकाश होन यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतवन बनसोडे यांनी केले, तर संजय इनामके यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!