राहुरी ग्रामीण प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पिंपरी अवघड ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी श्री शिवाजी सोपान लांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ. मिनाक्षी लांबे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या बैठकीत ही निवड संपन्न झाली.
सन २०२१-२६ या पंचवार्षिक कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंजेश्वर लोकसेवा मंडळाने सर्व ९ पैकी ९ जागांवर विजय मिळवत पिंपरी अवघड ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयी पथकाने “सर्वांना संधी” या तत्त्वावर कार्य करत सरपंच आणि उपसरपंच पदासाठी अनुक्रमे सौ. मिनाक्षी लांबे व श्री. शिवाजी लांबे यांची बिनविरोध निवड केली.
गेल्या साडेचार वर्षांपासून उपसरपंचपदी कार्यरत असलेले श्री. बापू उर्फ लहानु सखाराम तमनर यांनी गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली. मात्र सर्वांना संधी मिळावी या भूमिकेतून त्यांनी स्वखुशीने राजीनामा देत नवीन नेतृत्वासाठी मार्ग मोकळा केला. त्यांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
या निवड प्रक्रियेदरम्यान सौ. परवीनबानो शेख या सूचक तर सौ. रेखा पटारे व अमोल गायकवाड हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच श्री. शिवाजी लांबे व मावळते उपसरपंच श्री. लहानुभाऊ तमनर यांचा सत्कार सरपंच सौ. मिनाक्षी ताई लांबे, सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नवीन उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या. ग्रामसेवक सौ. शुभांगी चोखर, क्लार्क कृष्णा कांबळे व संजय वाघमारे यांनी निवड प्रक्रियेस सहकार्य केले.
कार्यक्रमास मुंजेश्वर लोकसेवा मंडळाचे मार्गदर्शक अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, माजी चेअरमन सुभाष दोंड, ह.भ.प. महेश महाराज लांबे, राजुभाऊ गायकवाड, तुकाराम लांबे, मुन्ना शेख, अंतवन गायकवाड, अनिता गायकवाड, चंद्रकला लांबे मॅडम, ऋषिकेश लांबे, बादशाह शेख, विकास लांबे, चंदू लांबे, निलेश लांबे, मोहन लांबे, बबन शेख, तुकाराम शिंगाडे, बाळूभाऊ लांबे, गंगाधर कांबळे, सोमनाथ लांबे, बाबुराव विरकर, कृष्णा लांबे, राजेंद्र लांबे, जयहिंद लांबे, अनिल बर्डे, सुभाष कांबळे, गणेश लांबे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार या वेळी ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला.
Leave a reply













