राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) : राहुरी तालुका तसेच जिल्हा अहिल्यानगर यांचा गौरव वाढवणारी बाब म्हणजे, राहुरी तालुक्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक रभाजी पलघडमल यांची नुकतीच मानव अधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मा.पलघडमल हे सध्या प्रगती विद्यालय, राहुरी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून, गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील दुर्बल व उपेक्षित घटकांसाठी न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन समितीच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपविली आहे.
निवड झाल्यानंतर मा.पलघडमल यांनी संस्थेच्या माध्यमातून मानव अधिकारांविषयी जनजागृती, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आणि प्रशासनाशी सुसंवाद या माध्यमातून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले, “मानव अधिकार म्हणजे फक्त कायद्याची अट नाही, तर प्रत्येक नागरिकाचा सन्मान आणि सुरक्षिततेचा पाया आहे.”
या निवडीबद्दल तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मा. पलघडमल यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वात राहुरी तालुका मानव अधिकार संरक्षण समिती अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मानव अधिकार संरक्षण समितीच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी अशोक रभाजी पलघडमल यांची निवड

0Share
Leave a reply












