SR 24 NEWS

इतर

अणदूर जिल्हा परिषद गटातून घरोघरी कमळ फुलवणाऱ्या निष्ठावंतांना संधी द्यावी — कार्यकर्त्यांची मागणी

Spread the love

तुळजापूर, दि. १५ (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील प्रतिष्ठित आणि चुरशीच्या अणदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते मा. पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.पडत्या काळात गावोगावी भाजपाचे कार्य बळकट करत घरोघरी कमळ फुलवण्याचे काम साहेबराव घुगे यांनी निस्वार्थ भावनेने केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांना उमेदवारीची संधी द्यावी, असा सूर युवा वर्ग आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

गेल्या तीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याची भक्कम पायाभरणी केली आहे. विद्यार्थी दशेपासूनच संघटनात्मक बांधिलकी जपत त्यांनी भारतीय जनता पक्षात निष्ठेने काम केले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व स्तरांवर सर्वसामान्य जनतेच्या अडचणी निरपेक्ष भावनेने सोडवण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. कोरोना काळात त्यांनी गरजू नागरिकांना अन्न, दिलासा आणि मदतीचा हात देत आदर्श घालून दिला.

‘वाचाल तर वाचाल’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वाचनालय चळवळ राबवून शिक्षण आणि जागरूकतेला चालना दिली आहे. तळागाळातील लोकांच्या हाकेला तत्परतेने प्रतिसाद देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

साहेबराव घुगे हे ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ या विचारधारेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या तीन दशकांच्या निष्ठावंत कार्याचा विचार करून पक्षाने अशा जनतेच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य व संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमध्ये तीव्रतेने होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!