SR 24 NEWS

इतर

वैद्यकीय सेवेबरोबरच समाजसेवा अग्रगण्य मानणारा, निर्मळ व हळव्या मनाचा अल्पसंतोषी माणूस -डॉ. नागनाथ कुंभार !

Spread the love

  वाढदिवस विशेष / चंद्रकांत हगलगुंडे

“जाग मुसाफिर भोर भया है ,रैन कहॉ जो सोवत है,जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. ‘ जागरूक की जय निश्चित है ‘…. हे ध्येय समोर ठेवून……

सध्याच्या धकाधकीच्या युगात पैसा असेल तरच प्रतिष्ठा अशी आभासी व चंचल वातावरणात वाटचाल करताना बोटावर मोजक्या इतक्या लोकांना मात्र दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड चढा-ओढ निर्माण झाली आहे. काहीही करा मात्र हे दोन क्षेत्र निवडा व खोऱ्याने मालामाल व्हा अशी सध्य स्थिती असली तरी स्वतः वैद्यकीय क्षेत्रात निव्वळ निस्वार्थ समाजासाठी काही देणे आहोत ,या उदात्त भावनेने समाजसेवेत समर्पित असलेले पंचक्रोशीत डॉ.नागनाथ कुंभार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

वडील शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत जवाहर विद्यालय संस्थेच्या स्थापनेपासून खारीचा वाटा असलेले अत्यंत शांत तथा सर्वांचे आवडते हाडाचे शिक्षक स्वर्गीय सिद्रामप्पा कुंभार यांचे ज्येष्ठ चिरंजीव नागनाथ .हे आदरणीय गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाप्रती तन-मन -धन समर्पित भावनेने काम करणे हा डॉ.कुंभार यांचा छंदच म्हणावा लागेल. गेल्या पंचवीस वर्षापासून धन्वंतरी क्लिनिकच्या माध्यमातून पंचक्रोशीतील रुग्णांना सेवा देण्याबरोबरच, रुग्णांनी विशेषता तरुणानी क्षणभंगुर सुखासाठी लाखमोलाचे जीव व्यसनाधीनतेत न घालवता यापासून चार हात दूर राहून स्वतःबरोबर कुटुंबाचे, समाजाचे किंबहुना राष्ट्राचे आरोगग्याप्रस्नी जागरूक राहण्यासाठी त्यांनी संजीवनी व्यसनमुक्त केंद्र उभारून असंख्य तरुणांना व्यसनापासून अलिप्त राहण्याचा कानमंत्र देऊन परिवर्तनाची चळवळ ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने रुजवण्याचे काम खरोखरच अभिमानास्पद व वाट चुकलेल्या वाट सरूना प्रेरणा देणारी आहे हे निश्चित.

अणदूर पंचक्रोशीत डॉ. जितेंद्र कानडे व डॉ. नागनाथ कुंभार ही जोडगोळी व्यवसायापेक्षा समाजकारणाला अग्रक्रम देऊन राजकारणात ही चंचू प्रवेश करण्यास सहकार्याने भाग पाडले. आज डॉ.नागनाथ सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून तर डॉ.कानडे गेली तीन टर्म ज्येष्ठ सदस्य म्हणून गाव सेवा करताना पाहावयास मिळतात. गावाप्रती व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे योगदान वाखा नण्याजोगे आहे. डॉक्टर म्हटल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना या शब्दाचा तिरस्कार वाटत असला तरी या गावची परंपरा मात्र वेगळीच म्हणावी लागेल. शिक्षण महर्षी सि.ना .आलूरे गुरुजी व सहकार महर्षी मधुकरराव चव्हाण या जोडीने राजकारणातून समाजकारण निस्वार्थ भावनेने अपेक्षे विना हा संदेश नव्या पिढीला आदर्श व प्रेरणावह असल्यानेच गावच्या विकासासाठी स्वहित बाजूला ठेवून चाललेले वाटचाल येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरेल.

जसा सहवास तशी वाटचाल, पेराल तेच उगवणार हे जरी खरे असले तरी माणूस माणसाच्या कामात थोडासा निस्वार्थ वेळ दिला तर काय घडू शकते हे या दोघाकडे पाहिल्यानंतर निश्चितच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. नवी पिढी व्यसनापासून दूर राहण्यासाठी तालुक्यासह परिसरात शेकडो व्याख्याने देऊन तरुणांना प्रेरित करण्याचे काम मात्र सध्याच्या ओढातानात प्रेरणादायी आहे. हे मात्र निश्चित.. 12 ऑक्टोबर डॉक्टर नागनाथ यांना अभिष्टचिंतन दिनानिमित्त जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने आभाळभर शुभेच्छा.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!