राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय प्रभाकर संसारे यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेचे वारे वाहत असताना काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाचा अनुसूचित जाती विभागाची जिल्ह्यात बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती विभागाची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असणारे संजय संसारे यांना काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसे पत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हाध्यक्ष बंटी यादव, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, उपाध्यक्ष राजाभाऊ वाकचौरे, संतोष गायकवाड, जिल्हा कायदेशीर सल्लागार प्रकाश संसारे उपस्थित होते. याप्रसंगी सरचिटणीस रामनाथ गायकवाड, सहसरचिटणीस शशिकांत थोरात, भाऊसाहेब खेमनर, सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग, सोनू गायकवाड, सोपान धेनक, साहिल म्हस्के, राहाता शहराध्यक्ष अमोल आरणे, कोपरगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पगारे, दगडूजी साळवे, जिल्हा सचिव सुरज म्हंकाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे, नवनिर्वाचित संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक शेळके, रवींद्र शेळके, अजय चव्हाण, श्रवण गायकवाड, दादासाहेब शेळके, अशोक शेळके, चांगदेव खेमनर, भाऊराव सरबंदे, रमेश भोसले, विकास बोरुडे, युवराज पारडे आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय संसारे यांच्या निवडीबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे सत्येंद्र तेलतुंबडे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे कांतीलाल जगधने, एआयएमआयएम पक्षाचे इम्रान देशमुख, माजी नगरसेवक मुज्जूभाई कादरी, सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई सय्यद, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, सुगी फाउंडेशनचे संदीप कोकाटे यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी संजय संसारे, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षांव

0Share
Leave a reply












