राहुरी प्रतिनिधी (जावेद शेख) : मुळा धरण क्षेत्रात वाढलेल्या आवक व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आज सायंकाळी १०.१५ वाजता धरणातील आवकमध्ये वाढ झाल्याने, आज सकाळी ९ वाजता मुळा नदीपात्रात होणारा विसर्ग २५ हजार क्युसेस एवढा करण्यात आला आहे.
धरणात सतत होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात वेळोवेळी कमी-जास्त बदल करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.या वाढीव विसर्गामुळे मुळा नदीकाठच्या खेड्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, पूरप्रवण क्षेत्रात जाण्याचे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून, ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Leave a reply













