SR 24 NEWS

क्राईम

श्रीरामपूरातील अवैध दारु अड्ड्यावर छापे, मुद्देमाल नष्ट

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार (श्रीरामपूर) : शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर श्रीरामपुर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना गावठी हातभट्टी दारुची विक्री करणार्‍यांवर छापा टाकून 1, 54, 200 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वॉर्ड नं. 01, गोंधवणी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु, भट्टी लावून तयार करणे चालु आहे. तसचे तयार हातभट्टी दारुची विक्री चालू आहे. परिसरातील नागरिकांच्या याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने, पो.नि. हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथक व वॉर्ड नं. 01 चौकीचे बिट अंमलदार यांना बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारु तयार करणार्‍या व विक्री करणार्‍याचा शोध घेवून कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने तपास पथक व वॉर्ड नं.01 चौकीचे बिट अंमलदार तात्काळ गोंधवणी परिसरात रवाना होवून, गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने माहिती घेवून सदर परिसरात छापे टाकून कारवाई केली.

याप्रकरणी संदिप सुरेश शिंदे, दिलीप दामोदर गायकवाड (रा. वडारवाडा, गोंधवणी रोड, वार्ड नं 1), अशोक सिताराम गायकवाड (रा. वडारवाडा) यांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून 1,54,200 चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!