राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : नगर–मनमाड महामार्गावरील दुरावस्थेच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथे तीन दिवसांपूर्वी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांपैकी नऊ जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागणीवर आधारित असल्याने त्वरित मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आज शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे सांगण्यात आले की, नगर–मनमाड महामार्गाच्या अत्यंत दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरू असून शेतकरी, व्यापारी, कामगार व प्रवासी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले गेले होते. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे हा लोकशाही मार्गाचा अपमान असून, नागरिकांच्या योग्य मागण्यांना गाळ घालण्याचा प्रकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी देवेंद्र लांबे, दीपक त्रिभुवन, संतोष लोढा, सतिष घुले, किरण कडू, अजय खिलारी, विलास तरवडे, प्रकाश पारख, जयसिंग घाडगे, संदिप गिरगुणे, राजेंद्र लांडगे, बाळासाहेब आढाव, गजानन घुगरकर, ज्ञानेश्वर जगधने, प्रितेश तनपुरे, योगेश आढाव, तुषार कडू, प्रवीण देशमुख, प्रशांत मुसमाडे, दिलीप गोसावी, महेंद्र दोंड, अमोल कदम, निलेश शिरसाठ, शशिकांत खाडे, संदीप महाडिक, ऋषभ संचेती, अनिल येवले, राजेंद्र जाधव यांच्यासह रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य, राहुरी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी एकमुखी मागणी केली की, महामार्गावरील तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे आणि नऊ आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे त्वरित मागे घेऊन नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेवरुन झालेल्या रास्ता रोको आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची निवेदनाद्वारे मागणी ”

0Share
Leave a reply












