नेवासा (प्रतिनिधी) / मोहन शेगर : सोनई, नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे मावा बनविण्याच्या कारखान्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. गेली अनेक दिवसांपासून सोनई परिसरात पोलीस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यांना पोषक असे वातावरण तयार झाले. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके, पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे, पोलीस कॉस्टेबल रमीझराजा आतार, पोलीस कॉस्टेबल प्रकाश मांडगे यांच्या पथकाने जाऊन पहाणी केली असता त्या ठिकाणी आरोपी सुनील आण्णासाहेब येळे (वय.२८) हा त्या ठिकाणी मावा बनविताना मिळून आला. ३८.५०० रुपये किंमतीची पाच किलोचे अकरा पाकिटे, सात हजार चे पाच पाकिटे, तिस हजाराची साठ किलो सुपारी, छत्तिशे रुपयांचा तयार मावा, सत्तर हजार रुपये किंमतीची मावा बनवण्यासाठी लागणारे मशीन, पाच हजार रुपये किंमतीचा वजन काटा, असा ऐवज ताब्यात घेतला आहे
Leave a reply













