मुंबई कांदिवली पश्चिम / भारत कवितके :कांदिवली मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ च्या पूर्व तयारीची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.मंगळवार दिनांक १२ आगस्ट २०२५ रोजी सकाळी ११वाजता मुंबई महानगर पालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय आर दक्षिण विभाग कांदिवली येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात सदर बैठक पार पडली, या मध्ये सहाय्यक आयुक्त मनिष साळवे, गणेशोत्सव समन्वय समिती सदस्य, विभागातील गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी,मनपा सर्व विभागातील कार्यकारी अभियंता,यांचा समावेश होता, या वेळी सहाय्यक आयुक्त मनिष साळवे यांनी सांगितले की,” गणेश उत्सव साजरा करताना अडचणी आल्यास त्या समन्वय समिती सदस्य, गणेश मंडळ यांच्या प्रयत्नातून दूर केल्या जातील*
यावेळी गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या,त्यावर शिवसेना नेते विनोद घोसाळकर, सहाय्यक आयुक्त मनिष साळवे यांनी मार्गदर्शन केले, मनपा व पोलीस परवाना घेणे बंधनकारक आहे, गणेश मूर्ती ची उंची मर्यादित असावी, गणेश मूर्ती ची उंची अर्जात नोंद करावी, ध्वनी प्रदुषण बाबत मंडळाने नियमाचे पालन करावे, सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच आरोग्य, रक्त दान शिबिर, पथनाट्य, सामाजिक संदेश देणारे फलक, शासकीय योजनांचा लोकांपर्यंत प्रसार करावा, मंडपाच्या जवळ पास दुकाने नसावीत, निर्माल्याचे वर्गीकरण करावे, घरगुती गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंत असावी, शक्यतो घरातील धातूच्या मूर्तीचै पूजन करावे, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती चे विसर्जन नैसर्गिक तलावात करावे, आणि ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती चे विसर्जन कृत्रिम तलाव मध्ये करावे.वाहतूक पोलीस, पोलीस, मनपा अधिकारी यांच्या सूचनेचे पालन करावे, कांदिवली येथे १६ ठिकाणी कृत्रिम तलाव आणि ३ नैसर्गिक तलाव विसर्जन साठी आहेत, आदी विषयांवर या बैठकीत सामुहिक रितीने चर्चा पार पडली, शिवसेना विभागप्रमुख संतोष राणे यांनी यावेळी कांदिवली विसर्जन तलाव, रस्ता, या समस्या मनपा ने सोडवाव्यात आणि गणेश मंडळाच्या समस्याशी आम्ही सहमत आहोत,असे सांगितले.
या बैठकीत सहाय्यक आयुक्त मनिष साळवे, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, विभाग प्रमुख संतोष राणे, शाखा प्रमुख, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, या विभागातील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके, कांदिवली गावठाण तलावाचे नरेंद्र मुन्वाचार्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a reply













